त्यांनी विहिरीलाच केले घर! जवळा येथील १५० घरे नियमाकूल करण्याची मागणी;विहिरीतल्या आंदोलनाने खळबळ

 
Yhgf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एक दोन नव्हे तर चक्क गरजू वंचित लोकांची १५० अधिकृत घरे असून, ही घरे सद्यस्थितीत नियमाकुल झाली नसल्याने एका त्रस्त ग्रामस्थाने बुलडाणा जिल्ह्यातील जवळा येथील ६० ते ७० फूट खोल विहिरी बेमुदत उपोषण छेडले आहे. देविदास मोरे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. जोपर्यंत घरे नियमाकुल होत नाही तोपर्यंत विहिरच माझे घर असल्याचे म्हणणे आहे.

कायदे चांगले असून उपयोग नसतो तर त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे केवळ योजना चांगल्या असून उपयोग नसतो तर ती राबविण्याची मानसिकता असावी लागते. अन्यथा त्या योजनेचा बोजवारा उडतो. सर्वसामान्य गरीब लोकांना हक्काची घरे देण्याच्या योजनेचा असाच बोजवारा शासकीय अनास्थेमुळे उडाला आहे.याला बदलते सरकारही कारणीभूत ठरत असते. समाजातील वंचित, गरीब आणि कष्टकरी वर्ग हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याची वस्तुस्थिती आहे.

खेडेगावात राहणारे गरीब, वंचित, शोषित, शेतमजूर, नागरिकांनी निवासी कारणासाठी अतिक्रमण करून छोटी घरे, छप्परे, पत्र्यांची घरे बांधून संसार थाटून कसेबसे जीवन जगत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील जवळा येथे देविदास मोरे यांनी चक्क विहिरीत उतरुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गावठाण पासून २०० मीटरच्या आत जवळपास १५० लोकांचे अधिकृत घरे आहेत. त्याची नोंद ग्रामपंचायतला असताना सुद्धा ही घरे आज पर्यंत नियमाकुल झालेले नाहीत. तर मेहकर तालुक्यात ही हीच परिस्थिती असून, यासाठी आपण अनेक वेळा अर्जाद्वारे मागणी केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे जवळा येथील धरणातील विहिरीत बसून अमरण उपोषण करत असल्याचे मोरे यांनी सांगितले. मागणी पूर्णत्वास गेल्यावरच उपोषण मागे घेईल असा पवित्रही त्यांनी घेतला आहे.