मृत्यू कधी अन् कसा येईल याचा भरवसा नाही; बातमी वाचून तुम्ही हेच म्हणाल! मलकापूरचा ३२ वर्षीय तरुण खेळता खेळता गेला..

 
hart
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मृत्यू कधी येईल याचा नेम नाही. हसता खेळता अनेकांना मृत्यूने  गाठल्याची उदाहरणे आहे. अर्थात मृत्यू हेच शाश्वत सत्य असले तरी मृत्यूने कोणत्या वयात गाठले यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील ३२ वर्षीय तरुणासोबत   मृत्यूने तसाच खेळ रचला! लहान मुलांसोबत खेळता खेळता अचानक हार्टअटॅक आल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

गजानन सोपान क्षीरसागर (३२) हा त्याच्या घरी त्याच्या चिमुकल्यांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक मृत्युमुखी पडला. याबाबत गजाननच्या मुलांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. यावेळी गजाननची पत्नी व इतर कुटुंबीय शेतात गेले होते. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या गावकऱ्यांना गजाननचा मृत्यू कशाने झाला याबाबत  अनेक प्रश्न पडले.  गजानन ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा पसरली होती. दरम्यान उत्तरीय तपासणीच्या अहवालात  गजाननचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण वयात हार्ट अटॅक आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.