पैनगंगेत पोहायला गेलेला तरुण अजूनही सापडला नाही!४८ तास उलटले! पेठची घटना; आमदार श्वेताताईंनी घेतला शोधकार्याचा आढावा!

 
hjhybh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील पेठ येथील तरुण पैनगंगा नदीत पोहायला गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना २५ जुलैच्या सायंकाळी घडली होती. दरम्यान आज, २७ जुलैच्या संध्याकाळपर्यंत ४८ तास उलटूनही बेपत्ता तरुणाचा शोध  लागला नव्हता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहेत. आज आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शोधकार्याचा आढावा घेतला.

पेठ येथील दोन तरुण २५ जुलैच्या सायंकाळी पैनगंगा नदीत पोहायला गेले होते. त्यातील विठ्ठल प्रल्हाद शेळके हा तरुण पाण्यात उडी मारल्यानंतर  बेपत्ता  झाला होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शोध घेतला, अमडापुर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान कालपासून नदीपात्रात शोध घेत असले तरी अद्याप तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान आज चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शोधकार्याचा आढावा घेतला.