सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याने घेतला गळफास! बुलडाणा तालुक्यातील वरवंड ची घटना

 
jyhh

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विस्तार अधिकारी पदावर चांगले काम केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यावर तालुक्यातील ग्राम वरवंड येथील रहिवासी ३६ वर्षीय एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  आज, ३ जानेवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. सुखलाल विठोबा लवंगे  (६८ ) असे मृतकाचे नाव आहे. 

सुखलाल हे १० वर्षांपूर्वी विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा पुतन्या गजानन नारायण लवंगे याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार सुखलाल यांना दारूचे व्यसन होते. काल २ जानेवारीला त्यांच्या पत्नी भावाला भेटण्यासाठी पिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव खान्देश येथे गेल्या होत्या. रात्री ते घरी एकटेच होते आणि अशात त्यांनी आपल्या पक्क्या घरात दोरी बांधून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे उशिरा बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.