३ वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा अखेर LCB च्या जाळ्यात!

 
4556
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ३ वर्षांपासून पोलिसांना वेळोवेळी चकमा देण्यात यशस्वी ठरलेला अट्टल गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाच. बबन उत्तम मोहिते (४२, रा. इंदिरानगर, दाताळा ) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  मोताळा तालुक्यातील दाताळा येथे आज, २७ एप्रिलला ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. दाताळा येथील बबन मोहिते याच्यविरुद्ध खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तीन वर्षांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. आज तो दाताळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून बबन मोहितेला पोलिसांनी ताब्यात घेत शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे ( बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सपोनि मनिष गावंडे, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दिपक लेकुरवाळे, गजानन गोरले, सुरेश भिसे यांनी पार पाडली.