तलाव तुडुंब!पण तरीही पाण्याअभावी पिके सुकली..! वीरपांग्रा गावचे शेतकरी कलेक्टर सायबांना भेटले; आंदोलनाचा दिला इशारा

 
uikg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  लोणार येथील वीरपांग्रा तलाव १०० टक्के तुडुंब भरलेला आहे. मात्र तलावातून कॅनल द्वारे किंवा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत नाही.अशी शेतकऱ्यांची ओरड असून,सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान जिल्हा यंत्रणेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्हा वाढत्या शेतकरी आत्महत्यामुळे महाराष्ट्रभर ओळखल्या जात आहे. शेतकऱ्यांचा सिंचन प्रश्न मार्गी लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.लोणार तालुक्यामध्ये यंदा चांगला पाऊस झालाय.ओढे,नदी नाल्यांना पूर आल्यामुळे चोरपांग्रा तलाव तुडुंब आहे. मात्र अतिवृष्टीने खरीप हंगाम हातून गेलाय. अशात रब्बी हंगामावर भिस्त असताना, गहू, हरभरा, शाळू व इतर पिके देखील पाण्याअभावी धोक्यात आली आहे.

वीरपांग्रा परिसरातील वसंतनगर,बीबी, किनगाव जट्टू ,सावरगाव तेली, यासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या वीरपांग्रा तलावाच्या पाण्यावरती अवलंबून असल्याने आणि महागडा लागवड खर्चकरूनही तो तो निघणार नसल्याच्या शक्यतेने  शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान हा पाणी प्रश्न जलसंधारण विभागाच्यावतीने तलावातून कॅनल द्वारे किंवा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी बुलडाणा निवासी जिल्हाधिकारी व जलसंधारण अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा सहदेव लाड यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.