स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेयस्तर निबंध स्पर्धेचे आयोजन तहसीलदार रूपेश खंडारे यांचा पुढाकार!

 
tashildar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त बुलडाणा तहसील कार्यालयातर्फे शालेय स्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

तहसीलदार रूपेश खंडारे यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही स्पर्धा 2 गटात घेण्यात येणार असून निशुल्क आहे. वर्ग 5 ते 8 आणि वर्ग 9 ते 12 अश्या दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

दोन्ही गटांसाठी प्रथम बक्षीस 1 हजार व ट्रॉफी, द्वितीय बक्षिस 700 व ट्रॉफी आणि तृतीय 500 रुपये व ट्रॉफी अशी स्वतंत्र बक्षीसे देण्यात येतील असे खंडारे यांनी सांगितले. तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकानी विध्यार्थ्यांचे निबंध एकत्रितपणे बुलडाणा तहसील कार्यालयात  11 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहे.  प्रत्येक निबंधावर शाळा, विध्यार्थीचे नाव, वर्ग व पालकाचा मोबाईल क्रमांक नमूद असावा.  या उपक्रमात शाळा व विध्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.