थर्टी फर्स्टची क्रेझ वाढतेय! शनिवार असल्याने शुक्रवारीच पार्टीचा बेत; नववर्षात फिरायला कुठे जाणार ? जवळच्या पर्यटन स्थळांची "ही" यादी वाचा...

 
yufhjg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरापाठोपाठ ग्रामीण भागात थर्टी फर्स्टची क्रेझ वाढतेय. यंदा शेकडो बोकड, कोंबड्या कटणार असून, खवय्याकडून शनिवारमुळे शुक्रवारीच पार्टीचा बेत आखल्या जात आहे.दरम्यान अनेकांना पर्यटनाला कुठे जायचं? हा प्रश्न पडलाय. 

विदेशाप्रमाणे थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टचा बेत आखला. ढाबे, हॉटेलची बुकिंग सुरू आहे.अनेकांनी नैसर्गिक सानिध्याला पसंती दर्शविली. नाचगाणी,गोंगाट पसंत नसल्यामुळे ते शांत वातावरणात नववर्ष साजरी करणार आहेत.तर काहींनी परिवारासोबतच घरामध्ये गोडधोड बनवून नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. श्रद्धेपोटी अनेक खवय्ये ३१ डिसेंबरला शनिवार असल्याने मांसाहार करणार नाही. त्यामुळे अशा खवय्यांनी शुक्रवारीच पार्टीचा बेत आखला आहे.

इथे साजरे करा नववर्ष...

बुलडाणा जिल्ह्यात व जिल्ह्यालगत अनेक धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. राजुर घाटातील श्री बालाजी मंदिर, श्री जाळीचा देव, शेगावचे उपस्थान मानला जाणारे गिरडा, बुलडाणाहून जवळच औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील लेणी, भोकरदन तालुक्यातील कालिंका माता, बुलडाणा जिल्ह्यातील जागतिक दर्जाचे लोणार सरोवर, ज्ञानगंगा अभयारण्य, हनुमान मंदिर, मस्त कलंदर दर्गा आणि बरीच ठिकाणे लोकांना वेगवेगळ्या दिशांनी आकर्षित करतात.सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान व श्री गजानन महाराज संस्थान शेगाव प्रसिद्ध असून, इतरही अनेक ठिकाणी पर्यटक भेट देत असतात.