चिखली तालुक्यातील कोलारा येथील शेतकऱ्याचा "बुलडाणा लाइव्ह"ला फोन! २४४३ रुपये विमा काढण्यासाठी लागले, अन् खात्यात जमा झाले २४७६ रुपये; खर्च वजा जाता हाती उरले ३३ रुपये..!

 ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर दुसरे काय..?

 
juyg
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काल, २४ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असलेली रक्कम पाहून सरकारने शेतकऱ्यांची अजब थट्टाच लावल्याचे दिसून येत आहे.चिखली तालुक्यातील शेतकऱ्याने "बुलडाणा लाइव्ह" ला विम्याच्या पैशाचा हिशोबच पाठवला. विमा काढण्यासाठी एकूण २४४३ रुपये खर्च आला अन् खात्यात २४७६ रुपये जमा झाले. खर्च वजा जाता हातात ३३ रुपये मिळाल्याचे शेतकऱ्याने "बुलडाणा लाइव्ह" ला सांगितले.

   jadhav

           जाहिरात☝️

कोलारा येथील शेतकरी गजानन    सोळंकी यांच्या खात्यात आज, २५ नोव्हेंबरला विम्याचे २४७६ रुपये जमा झाले. त्यांनी २१०९ रुपये पीक विमा काढला होता. १०० रुपये ऑनलाईन विमा काढणाऱ्याने घेतले. ३० रुपये सात-बारा काढण्यासाठी लागले.  २०० रुपये पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याने पंचनामा करण्यासाठी घेतले. ४ रुपये झेरॉक्स काढण्यासाठी लागले. या कामासाठी एकूण २४१३ रुपये खर्च आला. त्यामुळे खर्च वजा जाता हाती केवळ ३३ रुपये उरले असल्याचे गजानन सोळंकी यांनी 'बुलडाणा लाइव्ह" ला सांगितले.

    jadhav

                    जाहिरात☝️