बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत! पतीने दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार! माहेरचे म्हणतात सासरच्यांनीच केला गेम! देऊळगावराजा तालुक्यातील गारखेडची धक्कादायक घटना

 
tyjjf
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी कचरा फेकायला गेलेली विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना  देऊळगाराजा  तालुक्यातील गारखेड येथे घडली होती. दरम्यान त्याच विवाहितेचा मृतदेह आज, ५ सप्टेंबर रोजी गारखेड शिवारातीलच एका विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुभांगी नितीन शिंगणे (२८, गारखेड) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव  आहे. शुभांगीच्या माहेरच्या लोकांनी मात्र सासरच्या लोकांनीच शुभांगीची हत्या केल्याचा आरोप केलाय..!

३ सप्टेंबर रोजी सकाळी सासूने कचरा फेक म्हटल्यावर शुभांगी घराबाहेर गेली होती. मात्र ती न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती नितीन शिंगणे यांनी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान आज, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता शुभांगीचा मृतदेह गारखेड शिवारातील विहिरीत  आढळला. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या बाबतची माहिती मिळताच शुभांगीच्या माहेरच्या लोकांनी गारखेड गाठून शुभांगीचे प्रेत ताब्यात घेतले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आला. शुभांगीची हत्या करण्यात आल्याचा आरोप सासरच्यांनी केला असून याप्रकरणी सासरचे लोक तक्रार देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.