घरफोडीतील तरबेज तलवारसिंगला बेड्या! बुलडाणा शहर पोलिसांनी काय केले? वाचा..

 
Ytgh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पोलिसांची रात्रीची गस्त होत असली तरी, घरफोडीचे प्रमाण काही घटत नाही. मात्र बुलडाणा पोलिसांचा तपास सुरू असतो. काल एका घरफोडीतील तरबेज तलवारसिंग या घरफोड्याला गजाआड करण्यात यश आले. आरोपीकडून ८९७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रशीद शाह उर्फ तलवार सिंग हमीद शाह (४८, रा. नायगाव जि. अकोला) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

बुलडाणा शहरात १२ एप्रिल २०२२ रोजी समता नगर येथील सौ पूजा सपकाळ यांच्या घरात घरफोडी झाली होती. तब्बल १,०७०० रुपयांचे सोन्याचे दाग दागिने असा मुद्देमाल लंपास झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. तपासाअंती आरोपीला पकडण्यात आले. सदर आरोपी अमरावती जेलातून ताब्यात घेण्यात आला. आरोपीने धाड येथे एका सराफा दुकानदाराला वैद्यकीय कारण सांगून दागिने विकले होते. दरम्यान आरोपीकडून ८९७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून, तो अमरावती जेलातून ताब्यात घेण्यात आला. 

ही कारवाई शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने केली.