बुलडाणा अन्‌ चिखली तालुक्‍यातील या गावांसाठी झालेय टँकर मंजूर!

 
446
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील चौथा, गिरडा ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गोंधनखेड, डोंगरखंडाळा, वरवंड ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गोंधनखेड व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.

चौथा येथील लोकसंख्या 2250 असून येथे रोज 64 हजार 920 लिटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गिरडा येथील लोकसंख्या 445 आहे. येथे रोज 23 हजार 400 लिटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 7544 असूल येथे रोज 1 लक्ष 60 हजार 970 लिटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे. वरवंड येथील लोकसंख्या 102 आहे. येथे रोज 12 हजार 40 लीटर पाणी पुरविण्यात येईल.

तसेच कोलारा येथील 4640 लोकसंख्येला रोज 1 लक्ष 72 हजार 800 लिटर पाण्याच्या पुरवठा केला जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार या गावांना पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.