भर उन्हात गाडी चालवताना घ्या काळजी, नाहीतर तुमच्यासोबत घडू शकतो "हा" भयंकर प्रकार....!

 
757
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे सरासरी तापमान यंदा एप्रिल महिन्यातच चाळीशीपार पोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे रस्ते गरम होतात. गरम रस्त्यांवर चाकाचे  घर्षण झाल्याने चाकेही गरम होतात त्यामुळे जुने आणि तकलादू टायर फुटून अपघात होण्याची शक्यता जास्त असते. सध्या जिल्ह्यात टायर फुटून अपघात होत असल्याच्या घटना वाढत आहेत . टायर मध्ये हवा व्यवस्थित नसेल तर अशा अपघातांना निमंत्रणच मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात टायरमधील हवा वेळोवेळी चेक करणे गरजेचे आहे.

जीवाची लाहीलाही करणारे तापमान अपघातांना सुद्धा निमंत्रण देत आहे. उन्हाळ्यात प्रवास करतांना  वाहनांची योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाची कामे सिमेंटमध्ये झाली आहेत. शहरांतील रस्तेही आता सिमेंटची आहेत .

सिमेंटची रस्ते डांबराच्या रत्यापेक्षा जास्त गरम होतात. उन्हामुळे डांबर वितळून चाकाच्या आरीप्रमाने दाबल्या जाते मात्र सिमेंट रस्त्यावर टायरचे घर्षण होत असल्याने टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरदुपारी वाहन चालविणे टाळाच अशा सूचना गॅरेजचालक करीत आहेत .

अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात वाहनांबरोबर टायरची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वाहने सावलीत उभी करावीत.दुपारच्या वेळी भर उन्हात अधिक स्पीडने प्रवास करणे टाळावे. जुने झालेले टायर उन्ह्याळ्यात गाड्यांना बसवू नये.