हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची आज सांगता; ५० एकर क्षेत्रावरील महापंगतीला १०१ ट्रॅक्टरद्वारे होणार महाप्रसादाचे वितरण..!

 
Rfyy
हिवरा आश्रम( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  होय! भाविकांनो, राज्यातील लाखो भाविकांसाठी ५० एकर परिसरात १०१ ट्रॅक्टर द्वारे सामूहिक महापंगतीच्या माध्यमातून आज महाप्रसादाचे महावितरण होणार आहे. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची आज १४ जानेवारीला महाप्रसाद वितरणाने सांगता करण्यात येईल. दुपारी २ ते ४ दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे वितरण होईल. या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी केले आहे.

रोना काळानंतर यंदा स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यात १ लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात दरवर्षी सामूहिक शिस्तीची भक्ती दिसून येते. ५० एकर परिसरात एकाचवेळी पंगतीवर पंगती बसतात. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठते.१५१ क्विंटल पुरी, १०५ क्विंटल वांग्याची भाजी असे या महाप्रसादाचे स्वरूप आहे.

काल शुक्रवारी पहाटेपासूनच हा महाप्रसाद बनविण्यासाठी सुरुवात झाली होती. यासाठी स्वयंसेवकांचे हजारो हात पुढे आले. स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या महाप्रसादाची महापंगत शिस्तीचे दर्शन घडविणारी असून, आज जयंती महोत्सवाचा समारोप होणार आहे.