देशात ईडीचा वापर सूडबुद्धीने सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल
Jan 12, 2023, 13:54 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातील ९० ते ९५ टक्के आरोप - प्रत्यारोप व ईडीच्या धाडी या विरोधी पक्षातील लोकांवर पडल्या. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ईडीचा वापर केला.या ॲक्शनचा विचार केल्यास सत्ताधाऱ्यांच्या सूडबुद्धीचा प्रत्यय येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला आल्या असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होत्या. प्रथम त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या. सुप्रिया सुळे यांना "विरोधी पक्ष विरोधात ईडीचा वापर करीत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, इडी सरकारने कटकारस्थान करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी,महागाई यावर लक्ष दिले पाहिजे, तरच नागरिकांचे भले होईल. देशातील ९५ टक्के धाडी या विरोधी पक्षातील लोकांवर पडल्या आहेत. यासंदर्भात एका गृहस्थाने आरटीआय केले होते.
तेव्हा केंद्र शासनाने उत्तर देताना देशात ९५ टक्के विरोधी पक्षावरील आरोप - झाल्याचे वृत्तवाहिनी व वर्तमानपत्रात वाचले होते. ज्या पद्धतीने ईडीचा वापर होतोय तो दुर्दैवी आहे. खासदार राऊत म्हणा की देशमुख यांची चार्जशीट वाचली तर सूडबुद्धीचा प्रत्यय येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्या म्हणाल्या.