सागरी व्यापार क्षेत्रात प्रचंड संधी - सुनील शेळके यांचे प्रतिपादन! राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेसचे उदघाटन

 
Shelke
सिंदखेड राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारताचा जवळपास ९० टक्के आंतराष्ट्रीय व्यापार जलमार्गाने होतो. रस्ते वाहतुकीपेक्षा जलमार्ग वाहतूक खूप सोयीची आणि स्वस्त आहे. सागरी व्यापार क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेसचे संस्थापक संचालक सुनील शेळके यांनी केले. 

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेसचे उदघाटन संस्थापक संचालक सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  नगराध्यक्ष सतीश तायडे,  संस्थापक संचालक राहुल डोंगरदिवे, प्रियंका नाईक, न.प.  उपाध्यक्ष भीमा जाधव, राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, छगनदादा मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे, न. प. माजी उपाध्यक्ष दिलीपराव आढाव, माजी नगरसेवक महेश जाधव, न.प. अर्थ व बांधकाम सभापती गणेश झोरे, आरोग्य सभापती भिवसन ठाकरे, पाणीपुरवठा सभापती बालाजी मेहेत्रे, नगरसेवक त्र्यंबकराव ठाकरे, नगरसेविका दीपालीताई म्हस्के, आशामतीताई मेहेत्रे, ज्योतीताई म्हस्के, नंदाताई मेहेत्रे, सुमनताई खरात, सिंधुताई ठाकरे, चंद्रकलाताई तायडे, सारिकाताई म्हस्के, नगरसेवक रुखमन तायडे, राजेश आढाव, राजेश बोंद्रे, हाझरानुझहत काझी, शे. अजीम शे. गफार, बबन म्हस्के, भगवानराव सातपुते, डॉ. भीमराव म्हस्के, अमोल ठाकरे, डॉ. दत्तात्रय बुरुकुल, शाहीर रामदास कुरंगळ, राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांची उपस्थिती होती. संचलन शैलेशकुमार काकडे यांनी केले.

 

लवकरच होणार प्रवेश प्रक्रिया सुरु

राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेस ही विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील पहिलीच संस्था आहे. लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.  यामाध्यमातून या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इन्स्टिट्यूटचे कॉर्पोरेट कार्यालय गुडविल इनफिनिटी, ऑफिस नं. १००१, सेक्टर १२, खारघर नवी मुंबई येथेही असणार आहे.