सुधाकर मानवतकर यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरव !

 
yyyu
 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रतिभावंत साहित्यिकांची किनार लाभलेल्या जिल्ह्यात सुधाकर मानवतकर यांच्या नावाची आणखी भर पडली आहे. त्यांना २०२३ या वर्षाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार सर्वद फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने  मुंबई येथील साने गुरुजी विद्यालय दादर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सर्वद संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातील उत्कृष्ट साहित्यिकांची निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान केला जातो.यंदा या पुरस्कारासाठी बुलडाणा येथील साहित्यिक, कवी सुधाकर मानवतकर यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान या पुरस्काराने गौरविण्यात आले.सुधाकर मानवतकर यांच्या कविता अनेक नामवंत मासिक व दैनिकांमध्ये प्रसिद्ध होत असतात. शृंगार रस असो की निसर्ग सौंदर्य, समाजकारण असो की राजकारण त्यांच्या बहुतांश कविता माणुसकेंद्रीत असल्याने अनेकांना त्या जवळच्या वाटतात. त्यांच्या याच साहित्यकृतीचा गौरव झाला आहे.