साखरखेर्डा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली शांतता समितीची बैठक!; म्हणाले,कायदा मोडणाऱ्यांना धडा शिकवणार !

 
rt
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आगामी सण उत्सवांच्या काळात सामाजीक सलोखा कायम रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मात्र कुणी कायदा हातात घेत असेल, सामाजीक तेढ निर्माण करत असेल तर तो कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही असे प्रतिपादन सिंदखेराजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी केले. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आज, १मे रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
 राज्यात भोंग्यावरून वाद सुरू आहेत. आगामी काळात धार्मिक सण उत्सव आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत आहेत. आज , १ मे रोजी  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या उपस्थितीत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीतील गावांचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.