संपकऱ्यांचा शासनाला की ग्राहकांना शॉक?बुलडाण्यात २ हजार कर्मचाऱ्यांचा संप; ८० टक्के वीज पुरवठा खंडित होणार?

 
dp
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता,अधिकारी कृती समितीव्दारे राज्यव्यापी संपाची घोषणा केल्याची सूचना बुलडाणा लाईव्ह ने ३ जानेवारीला दिली. दरम्यान बुलडाण्यात खाजगीकरणाला विरोध म्हणून आज तब्बल २ हजार कर्मचाऱ्यांनी ३ दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने ८० % वीजपुरवठा बंद होणार असल्याचे संपकरी म्हणाले.

अकोला परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.त्यामुळे ३ जानेवारी मध्यरात्रीपासून  सुरू होणाऱ्या ७२ तासाच्या संप काळात सुरळीत वीज पुरवठ्याची  खबरदारी घेतली असली तरी,या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.वीज कर्मचाऱ्यांच्या संपात महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील  एकूण ३२ संघटनांचे कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी आहेत.

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी बुलडाण्यात १५०० महावितरण चे कर्मचारी आणि ५०० कंत्राटी कर्मचारी असे एकूण २००० कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला. हा तीन दिवसीय संप पुकारल्याने ८० टक्के वीजपुरवठा बंद होईल. उर्वरित २० टक्के वीज पुरवठा देखील टप्प्याटप्प्याने बंद होणार असल्याची माहिती संपकऱ्यानी दिली. महावितरण कंपनीतील खाजगीकरणाला विरोध म्हणून हा संप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.