जिल्हावसियांच्या आरोग्याला डंख! जिल्ह्यात साथरोंगांची घुसखोरी;डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया च्या रुग्णांची संख्या बातमीत वाचा;नवीन वर्षात तरी फवारणी होईल का?

 
uyjgh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन वर्षे पूर्ण कोरोना संसर्ग प्रादुर्भावात गेले. त्यानंतर सुटकेचा निःश्वास  सोडल्यावर बुलडाणा जिल्ह्यात २०२२ या वर्षात विविध रोगांनी घुसखोरी केली. विशेषता नागरिकांना ४१ डेंगूंचा डंख झाला. या व इतर साथरोगां संबंधात लोकप्रतिनिंकडून फवारणी मात्र झाली नाही, असा आरोप आता होत आहे.

जिल्ह्यात विविध साथरोगांनी गेल्या वर्षात डोके वर काढले होते. यामध्ये प्रामुख्याने डेंगू संशयित रुग्णांचे हिवताप जिल्हा कार्यालयाने ४४१ रक्त जल नमुने तपासले. यामध्ये ४१ आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हिवतापाचे २३ रुग्ण देखील आढळून आले. जिल्हा हिवताप कार्यालयाने ४८६१९१ रक्त नमुने तपासले. शिवाय चिकनगुनियाची रुग्ण आढळून येत असल्याने ४४१ रक्त जल नमुने तपासण्यात आले असता १९ रुग्ण समोर आले. जिल्ह्यात सर्वाधिक ३० हत्तीरोग रुग्ण सुद्धा आढळून आले आहेत. शिवाय स्क्रब टायफसचे २१ रुग्ण दूषित आढळून आल्याने नवीन वर्ष तरी रोगमुक्त व्हावे , यासाठी फवारणी कोण करणार? अशी मागणी सर्व स्तरातून उठत आहे.