स्व.राणा चंदन यांना १५१ जणांनी रक्तदानातून वाहिली आदरांजली स्वाभिमानीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 
tttt
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विद्यार्थी, तरुण, शेतकरी व सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारा आणि रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी अर्ध्यारात्रीही धाऊन जाणारा सच्चा समाजसेवी म्हणून स्व.राणा चंदन यांचे नाव आजही घेतले जाते. त्यामुळे स्व.राणा चंदन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करुन त्यांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीतून नमन करण्यात आले. स्वाभिमानी हेल्पाईन सेंटर येथे आयोजित या शिबिरात तब्बल १५१ जणांनी रक्तदान केले.

 अडल्या, नडल्यांच्या मदतीसाठी धाऊन जाणारा आणि रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी स्वत:रक्ताच पाणी करणारा, विद्यार्थी, शेतकरी, मजुर आणि युवकांचा हक्काचा नेता स्व. राणा चंदन यांना काळाने वर्षभरापूर्वी हिरावून घेतले. त्यांचे कार्य आणि त्यांच्या स्मृती कायम राहो, यासाठी त्यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदानातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदशनाखाली ११ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाणा अर्बनेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्व. राणा चंदन यांच्या पत्नी किरण चंदन व मातोश्री शांताबाई चंदन यांची विशेष उपस्थिती होती. तसेच ॲड. शर्वरीताई तुपकर, व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे,निलेश जोशी,भगवानराव मोरे,बबनराव चेके यांच्यासह शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला विद्यार्थी,युवक,महिला, शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


 यावेळी डॉ.ज्ञानेश्वर टाले, नितीन राजपूत, विजया कोळसे, पुष्पा सपकाळ, सुनंदा धोरण, संगीता चंदन, पूनम पाटील, शे.रफिक शे.करीम, पवन देशमुख ,दत्तात्रय जेऊघाले, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, दत्ता पाटील, आकाश माळोदे, संजय खारे, शेख जुल्फेकार, मधुकर शिंगणे, वसंतराव दहातोंडे, रामेश्वर अंभोरे, अंकुश सुसर, भागवत धोरण, रशीद पटेल, अनिल पडोळ, सुधाकर तायडे, कैलास जाधव, अविनाश डुकरे, अमोल बाहेकर, संजय तुपकर , ज्ञानेश्वर कणखर, गोपाल जोशी ,गजानन चंदन, राजेश बाहेकर, गोपाल जेऊघाले, सुदंशु जेऊघाले, धनंजय जेऊघाले, भरत गव्हाणे, आकाश तुपकर, विश्वास शेळके, सुनील टेकाळे, परमेश्वर पाटील, भगवान उबरहंडे, गणेश गायकवाड, विजय गायकवाड, राहुल वाघ, महादेव लाड ,शुभम फेंगडे, नितीन सोनटक्के, अमोल वाघमारे, रमेश सिरसाट, मधुकर थिगळे, श्याम धंदर, उत्तम खरात, प्रमोद टेकाळे, अंबादास मोरे, दत्तू पंडित, सदानंद माळोदे, आदेश काडेंलकर, भीमराव हिवरकर, रामेश्वर हिवरकर, पवन काकडे, विनोद आडवे, सीताराम जगताप, अनिल टेकाळे, विशाल जाधव, युवराज गोगल, अमेय सावजी, शाहरुख खान, राजाराम शिंदे, नारायण जाधव, जुबेर पटेल, मुकुंदा शिंबरे, किशोर शेळके, श्रीकांत चौधरी, संजय शिंदे, रमेश जोशी, चेतन जेऊघाले, निर्मल परदेशी, आकाश घनवट, सलीम शहा, हिम्मतराव तायडे, विनायक सरनाईक, यांच्यासह एकूण १५१ जणांनी रक्तदान करुन स्व.राणा चंदन यांना आदरांजली वाहिली. जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी व डॉ.अजित सिरसाट यांच्या लिलावती ब्लड बँक यांनी रक्त संकलनाचे काम केले. दरम्यान माजी जि. प. सभापती दिलीप जाधव, रा.कॉं.चे नेते नरेश शेळके, काँग्रेस नेते दत्ता काकस यांच्यासह विविध मान्यवरांनी देखील या शिबिराला भेट देऊन स्व.राणा चंदन यांना अभिवादन केले.