सिंदखेडराजा मतदारसंघात शनिवारी विशेष शिबिर! कुठेच जायची गरज नाही आपल्याच गावात ! काय आहे शिबिरात वाचा...

 
hgf
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदार संघामधील सिंदखेडराजा व देऊळगांव राजा - तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.००ते ४.०० वाजेपर्यंत विशेष कँपचे आयोजन करण्यात आलेले आहे. मतदान ओळखपत्रास आधार जोडणी कॅंपचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  एसडीओ भूषण अहिरे यांनी केले आहे.

danveविशेष कँप हे प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळा तर सिंदखेडराजा व देऊळगांव राजा शहरातील नगर परिषद शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. सदरचे दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविकांची नियुक्ती दोन्ही तालुक्यात करण्यात आली आहे. विशेष कँपचे ठिकाणी  तहसिलदार, नायब तहसिलदार, पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

सिंदखेडराजा मतदार संघातील ज्या मतदारांनी मतदान ओळखपत्रास अद्यापही आधार क्रमांकाची जोडणी केलेली नसेल त्यांनी आपला आधार क्रमांक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचेकडे किंवा १७ सप्टेंबर रोजी कँपचे ठिकाणी सादर करावा. विशेष कँपचे ठिकाणी प्रत्येक गावातील ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल आणि स्वस्त धान्य दुकानदार यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.