व्हॉईस ऑफ मीडियाची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी जाहीर! नंदुजी वाघमारे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोसले तर भगवान साळवे सांभाळणार कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी

 
chgc
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची सिंदखेडडाजा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत बागडे यांच्या निर्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून नंदुजी वाघमारे, उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब भोसले तर कार्याध्यक्ष म्हणून भगवान साळवे  दायित्व सांभाळणार आहेत.

 या  कार्यकारणीत मध्ये उपाध्यक्षपदी संतोष गाडेकर ,सरचिटणीस गजानन काळुसे, सहसरचिटणीस छगन झोरे, कोषाध्यक्ष मुकुंद पाठक, कार्यवाहक समीर कुरेशी, संघटक फिरोज शेख, प्रसिद्धीप्रमुख रमेश कोंडाणे, सदस्य म्हणून गणेश पंजरकर ,अफरोज शेख, विठ्ठल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे