बाजाराच्या दिवशी बुलडाण्याच्या बाजारात सन्नाटा; शहरी नागरिकांचा एल्गार मोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद; रविकांत तुपकरांचे भावनिक आवाहन शहरी नागरिकांना भावले..

 
jhb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथे आज, ६ नोव्हेंबरला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अतीविराट एल्गार मोर्चा पार पडला. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या गर्दीने रेकॉर्डब्रेक ठरला. एक दिवस अन्नदात्यासाठी द्या असे भावनिक आवाहन तुपकरांनी शहरी नोकरदार व व्यवसायिकांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. रविवारी बुलडाण्याचा बाजार असतो मात्र मोर्चाच्या वेळी आज बाजारात सन्नाटा दिसून आला.

तुमच्या ताटातल्या अन्नाला शेतकऱ्यांच्या घामाचा व श्रमाचा वास आहे. शेतकरी संकटात असल्याने तुम्ही त्यांच्या संकटात सहभागी व्हा. मोर्चात शहरी व नोकरदार वर्गानेही सहभागी व्हावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले होते. दरम्यान आज पार पडलेल्या अतिविराट मोर्चाला शहरातील व्यावसायिक , नोकरदार वर्गाने सुद्धा गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे रविवारी बाजाराचा दिवस असताना सुद्धा बाजार गल्लीत तुरळक लोकच दिसून येत होते.