धक्कादायक! सोने चोरीचा आता नवा फंडा;बुलडाण्यात चोरीच्या सोन्याची "अशीही" विल्हेवाट! पतसंस्था अध्यक्षांसह,सराफा व्यावसायिक, घरफोडे जाळ्यात! बुलडाणा शहर पोलिसांची मोठी कारवाई

 
kugjh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील एका पतसंस्थेचे अध्यक्ष,सराफा व्यापारी व घरफोडी करणारे टोळके यांनी तारण ठेवलेले सोने अनाधिकृतपणे मोडून चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या नव्या फंड्यामुळे पोलिस दलही चक्रावून गेले.आरोपींना गजाआड करीत,6 लाख 67 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला. आरोपींनी 16 घरफोड्या पैकी 9 घरफोडीची कबुली दिली असून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सय्यद शकील सय्यद युसुफ जोहर नगर, युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष अभय चोपडा मॅनेजर गणेश सोनुने, एस. एस. सराफा दुकानदार परेश विसपुते,सय्यद आदिल सय्यद मुनाफ, जोहर नगर,राजू बागवान आरस लेआउट, शेख बबलू शेख निजाम (सर्व रा. बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी संयुक्तरित्या कट रचला. चोरीचे सोने कोणतेही मालकी हक्क बाबतचे कागदपत्र न पाहता वेळोवेळी युनायटेड अर्बन या पतसंस्थेत तारण ठेवून व तारण ठेवलेले सोने अनाधिकृतपणे मोडून चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावली असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणाची माहिती आज 16 डिसेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षक आवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रपरिषद घेऊन दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, एपीआय निलेश लोधी, अभिजीत अहिराव आदी उपस्थित होते. घटनेची माहिती देताना एसपी सारंग आवाड म्हणाले की, सदर आरोपींनी आतापर्यंत 16 घरफोड्या केल्या आहेत. त्यापैकी 9 घरफोड्याची आरोपींनी कबुली दिली आहे. आरोपी सय्यद शकील सय्यद युसूफने 5 घरी घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच राजू बागवान, शेख बबलू शेख निजाम यांनी सुद्धा घरफोडी केल्याचे सांगितले. तसेच घरफोडीतील केली की, युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष,मॅनेजर व एस. एस. सराफ ज्वेलर्सचे परेश विसपुते हे मिळून चोरीचे सोने मोडत होते,अशी कबुलीही आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता, प्रथमदर्शनी आरोपींचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई शहर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुद्देमालावर दृष्टीक्षेप

सदर प्रकरणात 9 घरफोडीचे ,2मोटरसायकल चे असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहे.6, 60,000 रुपये किमतीचे 12 तोळे 3 ग्रॅम सोने,7,266 रुपये किमतीची 113 ग्रॅम चांदी असा एकूण 6 लाख 67 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कारवाईसाठी रिवार्ड मिळणार

शहर पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये शहर ठाण्याचे अधिकारी सपोनी  अभिजीत अहिराव, डीपी पथकाचे सपोनी निलेश लोधी, माधव पेटकर,प्रभाकर लोखंडे महादेव इंगळे, सुनील जाधव, गजानन जाधव, सुनील मोझे, युवराज शिंदे,साहिल पठ्ठे, विनोद बोरे, सुभाष धनवे,गणेश बाजड, शिवहरी सांगळे,सुनीता खंडारे यांनीही कारवाई केली. या कौतुकास्पद कामगिरीसाठी पोलीस महासंचालकांकडे रीवार्ड  साठी प्रस्ताव दाखल करू,असे एसपी आवाड यांनी सांगितले.