बुलडाणा लाइव्हचे संजय मोहिते, देशोन्नतीचे राजेश राजोरे ठरले देवर्षी नारद सन्मान पुरस्काराचे मानकरी!

 
mohite
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पावधीत जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या बुलडाणा लाइव्हचे संपादक संजय मोहिते आणि दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांना देवर्षी नारद सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. विश्व संवाद केंद्र बुलडाणा विभागाच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  सेवासंकल्प प्रतिष्ठानचे नंदकुमार पालवे, विश्व संवाद केंद्र विदर्भ प्रांताचे राजेशजी जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे, प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल  हा पुरस्कार देण्यात आला. संजय मोहिते, राजेश राजोरे, धीरज वैष्णव व नागेश कांगणे यांना देवर्षी  नारद सन्मान तर झी २४ तासचे मयुर निकम, दिव्य मराठीचे उद्धव थुट्टे पाटील, साहित्यिक नारायण पाटील लोकमतचे निलेश जोशी, अनिल गवई यांना देवर्षी नारद स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी राजेश राजोरे, नंदकुमार पालवे, चंद्रकांत बर्दे व प्रमुख वक्ते राजेश जोशी यांचे उद्बोधन झाले. सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज आहे. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी लिखाण करावे असे आवाहन यावेळी प्रमुख वक्ते राजेश जोशी यांनी केले.