बुलडाण्यात भगवी लाट! सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हिंदुराष्ट्रसेनेचे धनंजय देसाई म्हणाले" हिंदूंनी राजसत्तेला बांधील राहू नये, राजसत्ता हिंदूंना बांधील असली पाहिजे;
विश्व हिंदू परिषदेचे अटल पांडे म्हणाले, जात - पात विसरून हिंदू म्हणून एकत्र या! आ. गायकवाड म्हणाले, लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचून काढू

पुढे बोलतांना धनंजय देसाई म्हणाले की, सद्गुणांची विकृती झाल्यामुळेच हिंदूचा पराभव झाला. "अहिंसा परमो धर्म" हे आम्हाला अर्धवट शिकवल्या गेले, मात्र धर्मासाठी केलेली हिंसा ही अहिंसेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे म्हणायला अजित पवारांना लाज कशी वाटत नाही. संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि धर्मप्रेमी असण्याबद्दल औरंगजेबाला सुद्धा संशय नव्हता असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. प्रत्येक हिंदूने आपल्या जातीचा अहंकार न जपता हिंदू असल्याचा अभिमान बाळगावा. फांद्यांचा अहंकार न जपता मुळाचा अभिमान बाळगा असे ते म्हणाले. मुलींनो तुमचा विवेक जागा ठेवा, तुझे कौतुक करणारा प्रत्येक मुलगा तुझ्यावर प्रेम करेलच असे नाही तर त्यातील काही आफताब सुद्धा असू शकतात. लव्ह जिहाद हे मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, त्यापासून आपल्या लेकिंना वाचवा. लव्ह जिहाद करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, गोहत्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. सांस्कृतिक दृष्ट्या भारत हिंदू राष्ट्र आहेच मात्र राजकीय स्थरावर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशा आमच्या मागण्या असल्याचे धनंजय देसाई म्हणाले.
जात - पात विसरून हिंदू म्हणून एकत्र या: अटल पांडे
या देशात हिंदू बहुसंख्य असताना मागण्या मान्य करून घेण्यासाठी हिंदूंना मोर्चा काढण्याची वेळ यावी हीच शोकांतिका आहे. १९४७ ला भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा भारतात ७ टक्के मुस्लिम होते,आता मुस्लिमांची जनसंख्या २५ टक्के झाली आहे. मात्र पाकिस्तानातल्या हिंदूची संख्या घटली, आता तिथे १ टक्का सुद्धा हिंदू शिल्लक राहिले नाही. लोकसंख्येचा वाढता असमतोल हिंदू समाजापुढील मोठे आव्हान आहे. १९४७ लाच सगळे मुसलमान तिकडे पाठवायला पाहिजे होते, हे बाबासाहेब सांगत होते, मात्र तेव्हा बाबासाहेबांचे ऐकल्या गेले नाही. त्याचा परिणाम आता हिंदू समाजाला भोगावा लागत आहे. हिंदू समाजाने जात पात - भेदभाव विसरून एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मजागरण प्रमुख अटल पांडे यांनी केले.
लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचा: आ. संजय गायकवाड
लव्ह जिहाद ही हिंदू समाजाला लागलेली मोठी किड आहे. आतापर्यंत लव्ह जिहादला बळी पडलेल्या २२२ मुली आपण हिंदू धर्मात परत आणल्या. मी नखा पासून तर डोक्याच्या केसापर्यंत हिंदुत्ववादी आहे. बुलडाणा जिल्ह्यात लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आ.संजय गायकवाड यांनी केले. सभेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.