एसपी सारंग आवाड म्हणाले ॲक्शन मोडवर या! का आणि कशासाठी वाचा....

 
fgffg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या प्राणहानीपेक्षा रस्ते अपघातात होणारी हानी जास्त आहे. या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी २०२३ हे नववर्ष अपघातमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आज केले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी उपप्रादेशिक कार्यालयाला ॲक्शन मोडवर येण्याची मार्गदर्शक सूचना केली.

 आज, ११ जानेवारीला येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी
जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड,जिल्हाधिकारी
एच.पी.तुम्मोड,कार्यकारी अभियंता सुभाष राऊत,
जिल्हा कोषागार अधिकारी  श्री वाघमारे उपस्थित होते.दरम्यान प्रत्येक वर्षी जनजागृती केली जाते. परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी ॲक्शन मोडवर आले पाहिजे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी स्पष्ट केले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, वाहनधारकांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा. वाहने वेगाने चालवू नये. सीट बेल्ट लावणे अत्यावश्यक आहे असे गाजरे यावेळी म्हणाले. खरे तर रस्त्यावरून पायदळ चालताना किंवा दोन चाकी, चार चाकी वाहन आणि प्रवास करताना स्वतःबरोबर इतरांनाही त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. यासाठी वाहतुकीचे काही नियम आहेत. याची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे अत्यावश्य आहे. रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना इतर नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही याची जाणीव झाली की, वाहतूक नियमांचे पालन आपोआपच होत जाते, आणि ते अत्यावश्यक आहे.सिंग्नलचे पालन करा, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नका, ड्रिंक करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका, गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे संदेश देण्यात येत आहे.

वाहतूक नियमांचा जागर हवाच!

चौक सभा घेणे, बॅनर्स लावणे, माहितीपत्रके, हस्तपत्रके, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, रिफ्लेक्‍टर लावणे, विशेष मोहीम, मोटार वाहन प्रकरणे, वाहन परवाना संदर्भात जनजागृती करणे, दूरध्वनी क्रमांकाचे फलक लावणे, मोटार अपघातांचे सांकेतिक फलक लावणे, शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन, व्याख्यानांचे आयोजन, वाहतूक गार्डनला भेट देणे, रस्ते सुरक्षा तसेच घोषवाक्‍यांच्या स्पर्धा घेणे, अपघातांमधील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करणे.सार्वजनिक विभागाचे उपक्रम ब्लॅक स्पॉट, खड्डे दुरुस्ती, रस्ते तयार करणे, साईन बोर्ड व माहितीचे बोर्ड, दुभाजकाचे रंगरंगोटीचे काम, वाहतूक साधनांची दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना करणे, आदींचा जागर सुद्धा अत्यावश्यक ठरत आहे.