रिटायर पोलीस कर्मचारी बुलडाण्यात एकवटले! एसपींना भेटून खा. नवनीत राणांचा केला निषेध! वाचा काय आहे कारण..

 
uugyu
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या निषेधाचे लोण आता बुलडाण्यातही पोहोचले आहे. निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या बुलडाणा शाखेने त्यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे. 

 संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी  आज, १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व पोलीस अधीक्षक  अरविंद चावरिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. यातून संघटनेने आपल्या भावना मांडल्या आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसमवेत गैरवर्तन केले.

लोकप्रतिनिधी ची ही वागणूक निषेधार्ह असून पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. यामुळे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलिस एकटे नसून त्यांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी असल्याचे निवेदनात नमूद आहे.

यामुळे भविष्यात अश्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही व लोक प्रतिनिधी गैरवर्तन करणार नाही असा विश्वास निवेदनातून  व्यक्त करण्यात आला आहे. शिष्टमंडळात कार्यकारी अध्यक्ष दिलीप तडवी, उपाध्यक्ष संजय भंडारी, रवींद्र नरवाडे, अन्वर शेख, दिलीप देशमुख, श्याम पाटील, गजानन देशमुख, प्रकाश वाजपे, सैय्यद जब्बार, रमेश डब्बे, शेख सलीम, अशोक धुरंधर, विनोद शिंदे आदींचा समावेश होता.