बुलडाणा शहराचे नाव बदला! वाचा कुणी आणि का केली ही मागणी..
Sat, 7 May 2022

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराचे नाव बदलून भीलठाणा असे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील सामाजीक कार्यकर्ते किशोर बेंडवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.
आदिवासी भील समाजाने देशउभारणीत मोठे योगदान दिले आहे. ज्यांनी देशांसाठी रक्त सांडले अशा क्रांतिकारकांच्या यादीत भील समाजातील अनेक व्यक्तींचा समावेश आहे. बुलडाणा शहर परिसरात आधीपासूनच भील समाज मोठ्या प्रमाणात राहत आला आहे. त्यामुळे जुन्या काळात बुलडाणा शहराची ओळख भीलठाणा अशी होती. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचे नाव बदलून भीलठाणा असे करण्यात यावे अशी आग्रही मागणी किशोर बेंडवाल यांनी केली.यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.