खरेच डोळ्यांचे पारणे फिटले! हेलिकॉप्टरने राजमातेवर पुष्पवर्षाव; अभिता कंपनीचे संस्थापक सुनील शेळके यांची अनोखी मानवंदना!

 
Ggh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर हेलिकॉप्टरने झालेली पुष्पवृष्टी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. अभिता कंपनीचे संस्थापक तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या पुढाकारातून हेलिकॉप्टर द्वारे आज पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांनी अनोखी मानवंदना दिल्यामुळे राजमातांच्या या सोहळ्याला ऐतिहासिक किनार लाभली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार अमोल मिटकरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दर वर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह देश व जगभरातील जिजाऊ भक्त व शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात.या सोहळ्यानिमित्त सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव राबवला जात आहे.मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता राजवाड्यातील जन्मस्थळी झाली.मुख्य कार्यक्रम दुपारी २ ते ६ या वेळी शिवधर्मपीठ येथे होईल.

ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान राजमाता जिजाऊंच्या जन्म सोहळ्यानिमित्त राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर हेलिकॉप्टरने झालेली पुष्पवृष्टी लक्षवेधी ठरली. यासाठी अभिता कंपनीचे संचालक तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला.