राजर्षी शाहू मल्टिस्टेट 'सहकार गौरव' पुरस्काराने सन्मानित! शिर्डी येथे सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून झाला गौरव! संदीपदादा शेळके म्हणाले, पुरस्कार जिल्ह्यातील जनतेला समर्पित..!

 
Rthh
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत दिला जाणाऱ्या सहकार गौरव पुरस्कार २०२२ करिता 'सर्वोत्कृष्ट संस्था' म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीला सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथील पुष्पक रिसॉर्टमध्ये १३ जानेवारी रोजी हा शानदार सोहळा संपन्न झाला.

मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश अण्णा वाबळे, सहकार भारतीचे महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, सरव्यवस्थापक नितीन उबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

दैनंदिन व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकारात बदल घडवणारी संस्था म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेटकडे पाहिले जाते. सामाजिक कार्यात संस्थेचा नेहमी पुढाकार राहिला आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत सहकार गौरव पुरस्काराकरिता सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


जिल्ह्यातील जनतेने सहकारी चळवळीवर विशेषतः सहकारी पतसंस्था, सहकारी बँकांवर नेहमीच प्रचंड विश्वास ठेवला आहे. त्यामुळे हा पुरस्कार सहकार चळवळ जिवंत ठेवणाऱ्या जिल्ह्यातील जनतेला आणि राजर्षी शाहू परिवारातील सर्व सभासदांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी दिली.