धुक्याने रब्बी पिके धोक्यात! गहू , हरबरा ,कांदा अन् आंबाही धोक्यात! शेतकऱ्यांनो "ही" घ्या काळजी..

 
jhggf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,४ जानेवारीला असलेले ढगाळ वातावरण अन् आज ५ जानेवारीला सकाळपासून जिल्हाभर पसरलेली धुक्याची चादर पिकांसाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत.

खरिपात झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांपासून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठे तुडूंब असल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र आज पसरलेल्या धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती आहे. फुलांत आलेल्या हरबरा पिकांची फुलगळ होऊन उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय धुक्यामुळे मोहर आलेला आंबा सुद्धा धोक्यात असून धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहर गळून पडण्याची शक्यता आहे. गव्हावर तांबेरा रोग पडण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
   
ही घ्या काळजी...

  धुक्यामुळे पिकांचे नुकसान असल्याने शेतकऱ्यांनी सकाळच्या वेळी शेतातील बांधावर धूर करावा. संध्याकाळचा वेळी सुद्धा धूर केल्याने  पिकांचा धुक्यापासून होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय  बुरशीनाशकांची फवारणी करावी.