बुलडाण्यात आज सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; कलीचरण महाराज, धनजंय देसाई करणार मोर्चाला संबोधित

 
maharaj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लव्ह जिहाद व धर्मांतराच्या विरोधासह इतर अनेक मुद्द्यांवर सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा आज,२ जानेवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्हाभरातील जवळपास सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी या मोर्चाला पाठींबा दिल्याने या मोर्चाला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

  विशेष म्हणजे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे कालीचरण महाराज आणि धनंजय देसाई या मोर्चाला संबोधित करणार आहेत. बुलडाणा शहरातील संगम चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर कालीचरण महाराज आणि धनजंय देसाई मोर्चाला संबोधित करतील. दरम्यान पोलिसांनी या मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.