महाराणा प्रताप जयंती निमित अंचरवाडीत जगदीशचंद्र पाटलांचे जाहीर व्याख्यान! महाराणांच्या चारित्र्याचा करणार जागर

 
ergjh
अंचरवाडी ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अंचरवाडी (ता. चिखली) येथे आज, ९ मे रोजी महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, साहित्यिक व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. जगदीशचंद्र  पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीं ८ वाजता अंचरवाडी येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडणार आहे.

त्याआधी आज, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. या आरोग्य शिबिरासाठी डॉ . पंढरी इंगळे, डॉ योगेश काळे, डॉ. सांगर ठेंग, डॉ. आकाश ठोसरे, डॉ. गोपाल परीहार ही तज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित राहणार आहे

. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भव्य मिरवणूक पार पडणार आहे. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जाहीर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.