एल्गार मोर्चाची तयारी पूर्ण:उद्या बुलडाण्यात धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! रविकांत तुपकर व पोलीस अधिकाऱ्यांनी केली मोर्चा मार्ग व सभा स्थळाची पाहणी..!

 
jhfv
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या रविवारी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा निघणार आहे. जिल्हाभरातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी शहरातील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली आहे. चोख बंदोबस्त,वाहतूक नियोजनाची संपूर्ण तयारी केली आहे. दरम्यान आज सकाळी रविकांत तुपकर व उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन कदम, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर तसेच डीबी पथक व पोलीस कर्मचारी यांनी मोर्चाचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. गेल्या वर्षी मोर्चानंतर राज्यभर आंदोलन पेटले होते. यावर्षी आता रविकांत तुपकर एल्गार मोर्चात कोणती भूमिका घेतात. पुढील आंदोलनाबाबत काय घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.