१७ नव्या बोलेरोंतून बुलडाण्याचे पोलीस करणार गुन्हेगारांचा पाठलाग!; नवी वाहने दलात दाखल

 
56
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने १७ नव्या बोलेरो खरेदी केल्या आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते ही वाहने आज, २२ एप्रिलला दुपारी दोनच्या सुमारास दलात दाखल करून घेण्यात आली. पोलीस मुख्यालयात हा सोहळा झाला. नव्या बोलेरोंशिवाय २ टीव्हीएस मोटारसायकली, ९ मोपेडही खरेदी करण्यात आली आहेत.

 

56

सध्या बुलडाण्याच्या पोलीस दलात एकूण ३०४ वाहने आहेत. त्यातील १८४ चालूस्थितीत असून, १२० वाहने कामात नाहीत. ही १८४ वाहने चारचाकी आहेत तर ५४ वाहने दुचाकी आहेत. जिल्ह्याच्या पोलीस दलाकडे वाहनांची कमतरता होती. त्‍यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला. त्‍यातून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यातून नवी वाहने खरेदी करण्यात आली.

नव्या वाहनांतील १ बोलेरो व २ मोटारसायकली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला देण्यात आली आहेत. श्री. चावरिया यांनी वाहनांची पाहणी  केली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गिरीश ताथोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गिते, पोलीस निरीक्षक सादिक पठाण, सहायक पोलीस निरीक्षक श्री. झांबरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, बिनतारी संदेश पोलीस निरीक्षक श्री. काळवाघे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. काळे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय रिंढे, प्रबंधक सौ. सुषमा पांडव व मोटार परिवहन विभागातील चालक पोलीस अंमलदार उपस्थित होते.