सुखद ब्रेकिंग! व्वा क्या बात है..!स्वाईप मशीन,फोन पे- गुगल द्वारे देखील काढता येतील एसटीची तिकिटे! बुलडाणा विभागाला मिळाल्या ८५० स्वाईप मशीन..!

 
mashin
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसटी महामंडळचा प्रवास सुखद व वादविवादमुक्त होण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊले उचलली असून  प्रवाश्याना तिकिटे देण्यासाठी  तब्बल ५ हजार स्वाईप मशीन खरेदी केल्या आहे. बुलडाणा विभागाला यातील ८५० मशीन देण्यात आल्या आहे.

सुट्या पैश्यावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद नेहमीची बाब ठरली आहे. हे टाळून व प्रवास डिजिटल करण्यासाठी या मशीन वापरण्यात येणार आहे. या मशीनवरून  यूपीआय, फोन पे, गुगल पे द्वारे सुद्धा तिकीट काढता येणार आहे.एवढेच नव्हे रोख रक्कम नसली तरी प्रवास करणे शक्य होणार आहे. जिल्ह्याला ८५० मशीन मिळाल्या असून त्याचे ७ डेपोला वितरण करण्यात येऊन वाहकाना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक संदीप रायलवार व डीटीओ अमृत कच्छवे यांनी बुलडाणा लाइव्ह सोबत बोलताना दिली.