पिक विमा! कधी होईल जमा? देऊळगावमहीचे शेतकरी म्हणतात आता जलसमाधीच घेऊ..

 
uyt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवकाळी पाऊस, अवर्षण,दुष्काळ या संकट काळात पीक विमा नक्कीच आधारवड मानला जातो. पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे आहे, असे आता देऊळगाव राजा येथील शेतकऱ्यांना वाटू लागल आहे. पिकांचे नुकसान झाले. अत्यल्प शेतकऱ्यांच्या खात्यात अल्प रक्कम जमा झाली तर बहुतांश शेतकऱ्यांना कवडी देखील मिळाली नाही. 'पिक विमा व दुष्काळ निधी द्या' अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासकीय यंत्रणेला देऊळगाव मही येथील शेतकऱ्यांनी आज दिला.

देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२२-२३ या वर्षात अनियमित पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. सावध भूमिका म्हणून तत्पूर्वी शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु अद्यापही पीक विमा आणि दुष्काळ निधी पदरात पडलेला नाही. शासकीय स्तरावरून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची अल्प रक्कम जमा झाली. परंतु बहुतांश शेतकरी या रकमे पासून वंचित आहेत. शासनाने दुष्काळ निधी संदर्भात ठोस असा निर्णय घेतलेला नाही.

कर्जा संदर्भात शेतकऱ्यांची बँकेत अडवणूक होत आहे. बचत खात्याला होल्ड लावण्यात येते. या संदर्भातील ठोस उपाय योजना करून शासनाने २१ जाने पर जानेवारीपर्यंत न्याय द्यावा, अन्यथा 26 जानेवारीला संत चोखासागर जलाशयात जलसमाधी घेऊ असा इशारा देऊळगाव मही येथील अनिल शिंगणे व शेतकऱ्यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.