बुलडाण्यातील पानटपरीधारक धास्तावले! ३९ जणांना तंबाखू नियंत्रण पथकाचा दणका

 
ufyyh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील ३९  पानटपरीधारकावर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आज २२  डिसेंबर रोजी कारवाई केली. यात त्यांच्याकडून ७ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने पानटपरीधारकांचे धाबे दणाणले आहे. 

शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, इकबाल चौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक आदी परिसरात ३९ पानटपरीधारकावर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई करून दंड वसूल केला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम २००३ नुसार ही कार्यवाही करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रामविजय राजपूत, शिपाई ओमप्रकाश साळवे, लेकुरवाडे, प्रवीण पडोळ, जगदेव टेकाळे, संजय तागवे,  दिगांबर कपाटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक सरकटे सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांच्या चमूने ही कारवाई केली.