अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रेतयात्रा काढणार! वृद्ध कलावांतांनी अर्ध लग्न आंदोलन करून दिला इशारा! वाचा काय आहे कारण...

 
6fgu
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामाजिक प्रश्नांसाठी लोककलावंत पोटाला चिमटा काढून जनजागरणाचे काम करत असतात. मात्र जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मानधन यादीतील खऱ्या लाभार्थ्यांना डावल्याचा आरोप करत पैनगंगामध्ये नदीपत्रात आज वृध्द कलावंतांनी आंदोलन केले. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रेतयात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला.

थिएटर नाही,वेशभूषा साधीसुधी, गावाचा पार, कुणाच्या तरी घराचं अंगण किंवा एखादं मंदिर हेच या लोककलावंताचं नेपथ्य आणि स्टेज.. या थेटरात असे गोंधळ, जागरणं, नाटकं, कीर्तन,भारूडं वर्षानुवर्ष रंगत आहे. राज्य सरकारने दिलेली सामाजिक जबाबदारी पार पाडली जाते. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून लोककला आणि सामाजिक प्रश्नांची परंपरा जतन करणाऱ्या कलावंतांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटाला जगण्यासाठी अन्नाचे चार घास लागतात, याचा विसर मायबाप सरकारला पडला आहे.

राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिले जाते. परंतु ३७ कलावंत लाभार्थ्यांना अनुदान मिळालेच नाही. त्यासाठी त्यांनी यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रेत यात्रा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला. आंदोलनात ईश्वर चंदेल सह कलावंत उपस्थित होते सहभाग झाले होते.