बुलडाण्याच्या शिवकृपा मोटर ड्राइविंग स्कूलच्या वतीने शरद पवार हायस्कूल मध्ये वाहतूक नियमाबद्दल जनजागृती कार्यशाळा संपन्न ! संचालक नितीन सोनटक्केंनी सगळ सोप करून सांगितलं! म्हणाले, प्रवास करतांना....

 
jhfg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आज दिनांक १० सप्टेंबर रोजी रोजी शरद पवार हायस्कूल पांगरी ( उबरहंडे ) येथे शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूल च्या वतीने वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली.

या कार्यशाळेला ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक नितीन सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्कूलबस मधून प्रवास करताना स्कूलबस मध्ये शांततेने प्रवास करावा, तसेच स्कूलबस मध्ये चढताना व उतरताना पूर्ण गाडी थांबू द्यावी आणि नंतरच स्कूलबस मध्ये चढावे तसेच उतरावे असे सांगितले. रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालावे ,तसेच शाळेत जाताना सायकलवर कोणतीही स्टंटबाजी करू नये. तसेच पालकांनी आपल्या मुलांना स्कूलबस मधून पाठवावे म्हणजे त्यांचा प्रवास सुरक्षित होईल असेही नितीन सोनटक्के यावेळी म्हणाले. रस्ता ओलांडाताना मुले, वृद्ध व अपंगांना , अंधांना मदत करा. मोटर सायकल चालवत असतांना हेल्मेट चा वापर करा.  कार चालवतांना सीट बेल्टचा वापर करावा.  

पालकांनी आपल्या मुलांना अठरा वर्षाच्या खाली असेल तर वाहन चालवण्यास देऊ नये. स्कूल बस मधून प्रवास करताना हात बाहेर काढू नये. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. अपघातग्रस्तांना मदत करावी. तसेच मानसिक स्थिती बरोबर नसल्यास वाहन चालू नये अमूल्य मार्गदर्शन शिवकृपा मोटर ड्राइविंग स्कूलचे संचालक नितीन सोनटक्के यांनी यावेळी केले.
 यावेळी शाळेचे शिक्षक वृंद प्राचार्य भाऊसाहेब वानखेडे,गजानन पवार, श्री काळे, श्री चिंचोले , श्री राजपूत , श्री गायकवाड , श्री निकाळजे , श्री  सुरडकर, श्री आंधळे व सोळंके मॅडम आदी उपस्थित होते