अभिता कंपनीच्या वतीने उद्या राजमाता जिजाऊंना अनोखे अभिवादन! हेलिकॉप्टद्वारे होणार माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावर पुष्पवृष्टी;

शेतकऱ्यांसाठी होणार किसान ड्रोन चे लॉन्चिंग; रोजगार मेळाव्यात निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रही मिळणार
 
shelke
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता माँ  जिजाऊसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा उद्या,१२ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान  शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अल्पावधीत राज्यभरात नावलौकिक मिळवलेल्या अभिता कंपनीच्या वतीने उद्या राष्ट्रमाता  माँ  जिजाऊसाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने माँ जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा सोहळा शेतकऱ्यांसाठी किसान ड्रोन लॉन्चिंग  आणि बेरोजगारांना रोजगार देऊन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न अभिता कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे.

    shelke

                  (जाहिरात👆)

दिशा  बुलडाणा जिल्हा महिला बचतगत फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मातृतीर्थ सिंदखेराजा शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात १२ जानेवारीच्या सकाळी १० वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. यासाठी अभिता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शेळके हे मुंबईवरून हेलिकॉप्टरने सिंडखेडराजा नगरीत येणार आहेत. सकाळी ११ वाजता  माँ जिजाऊसाहेबांच्या जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पुष्पवृष्टी करतेवेळी सुनील शेळके यांची कन्या कु. अभिता शेळके सोबत असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी किसान ड्रोनचे लॉन्चिंग..!!
   राजमाता माँ जिजाऊसाहेबांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात येणार आहे. मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यादरम्यान  शेतकऱ्यांसाठी किसान ड्रोनचे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. अभिता कंपनीच्या वेबसाईटचे लॉन्चिंग देखील यावेळी करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सर्विसेस चे उद्घाटन देखील यावेळी अभिता कंपनीचे संस्थापक , मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे.