वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या; चिखली तालुक्यातील घटना

 
544
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, २४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता चिखली तालुक्यातील अमडापूर येथे ही घटना घडली.
साहेबराव जयंता गवई (५५, रा. मिलिंदनगर, अमडापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव गवई यांनी त्यांच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच अमडापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.