जुना गडी नवीन राज! बुलडाण्यात आधी डीवायएसपी म्हणून राहून गेलेले बी.बी.महामुनी आता बुलडाण्याचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येणार..

 
erg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नवीन एसपी म्हणून सारंग आवाड आल्यानंतर आता जिल्ह्याला( घाटावरील) नवीन अप्पर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तीन वर्षांपूर्वी बुलडाणा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यकाळ गाजविणारे बी.बी.महामुनी आता जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत.

अरविंद चावरीया एसपी असतांना बजरंग बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक होते. श्री. बनसोडे यांचे एनआयए ( राष्ट्रीय तपास यंत्रणा) येथे प्रमोशन झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक ( खामगाव) यांच्याकडेच बुलडाण्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून जिल्ह्याला श्री. तूम्मोड हे नवीन कलेक्टर मिळाले. त्यानंतर लगेच अरविंद चावरिया यांची बदली होऊन नवीन एसपी सारंग आवाड यांची नियुक्ती करण्यात आली. आता आवाड यांच्या साथीला बी.बी.महामुनी हे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कारभार सांभाळणार आहेत. याआधी बुलडाणा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ दमदार राहिला होता.दरम्यान आता बदललेल्या जबाबदारीत ते कसे कर्तव्य निभावतात याकडे लक्ष राहील.