अरे देवा ! कार ५० फूट दरीत कोसळली, सुदैवाने झाडीत अडकली! २ कॉलेज तरुण गंभीर; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

 
ghg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे तर दुसरीकडे अपघातांची मालिका! शुक्रवारी ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्त्यावर भरधाव वेगातील एक कार थेट ५० फूट दरीत कोसळली. परंतु कार २० फूट दरीतील झाडांमध्ये अडकली. यावरुन या बसचा वेग किती जबरदस्त होता, याची निव्वळ कल्पना करता येऊ शकते! परंतु या अपघातात जीवितहानी झाली नाही तर २ तरुण जखमी झाले आहेत. ही घटना काल २० जानेवारीला ४ वाजताच्या सुमारास घडली आहे.

 या घटनेवर दृष्टिक्षेप टाकला असता, बुलडाणा येथून खामगावकडे एम एच ३० ए एफ १४१३ क्रमांकाची कार भरधाव वेगात जात होती. कार मध्ये चार ते पाच महाविद्यालयीन युवक होते. दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्य यातील उत्तर देव्हारी बीट मधील लाल माती घाटात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारचा वेग जास्त असल्याने कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. परंतु ही कार सुदैवाने २० फूट खोल जाऊन दाट झाडांमध्ये अडकल्याने पुढील अनर्थ टळला. झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, जखमींची नावे कळू शकली नाही.

दरम्यान 
समाजमाध्यमांच्या मदतीने वाहतुकीचा रोज एक नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात असून तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवले जात आहे. भरधाव गाडी चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे यांसारखे नियम मोडणाऱ्यांमध्ये तरुणवर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहींना कायमचे अपंगत्व येते.नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी सजगता बाळगावी आणि नियम मोडून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.