अरे देवा..! जमिनी अजूनही ओल्याच; परतीच्या पावसाने लांबल्या गहू, हरबऱ्याच्या पेरण्या..!

 
ghc
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. कधी नव्हे एवढा सोयाबीन सोंगण्याचा हंगाम लांबला. दरम्यान अजूनही शेतजमिनी ओल्या असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या लांबल्या आहेत.

 पावसाळा संपला तरी पावसाचा मुक्काम जिल्ह्यात लांबला होता. दरवर्षी दिवाळीच्या आधी गहू, हरभरा पिकाच्या बहुतांश पेरण्या आटोपलेल्या असतात. यंदा मात्र अजूनही काही शेतात ट्रॅक्टर जात नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतजमिनी सुकलेल्या भागात आता पेरण्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान यंदा नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून हरबऱ्याचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.