आता थुकरटपणा थांबणार!तंबाखूमुक्तीसाठी जिल्हाधिकारी सरसावले! तबांखु खाऊन कुठेही थुंकाल तर सावधान....

 
jmh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  तंबाखू -गुटखा खाऊन कुठेही थुंकल्या जाते.हा थुकरटपणा थांबवून बुलडाणा जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तूम्मोड यांनी पुढाकार घेतलाय. आज एका बैठकीत त्यांनी तंबाखूमुक्तीसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे अधोरेखित केले. जिल्हास्तरीय पथकांनी कार्यवाही करावी,अशी मार्गदर्शक सूचना देखील केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्हा स्तरीय समन्वय समिती व जिल्हास्तरीय अमंलबजावणी पथकाच्या आढावा बैठकीला डॉ. यास्मीन चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, गुन्हे शाखेचे श्री. वानखेडे, अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, शिक्षण विभागाचे श्री. अकाळ, श्रीमती राठोड,  जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. टाले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर, सलाम मुंबई फाउंडेशन महेंद्र सौभागे, ब्रम्हकुमारी संचालक उर्मिला दीदी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक लक्ष्मण सरकटे, सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख, तनवीर पठाण उपस्थित होते.

- ३ महिन्यात १५ हजाराची दंडात्मक कारवाई

जिल्हा अंबलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्याच्या काळात तंबाखू प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत पानटपरीधारक व नागरिकांवर कारवाई करून १४ हजार ९७० रुपये वसुली केली आहे.

अडीच हजारावर रुग्णांची मुख तपासणी

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभरात दंतरोग तपासणी, क्षयरोग तपासणी, एड्स रुग्ण, रक्तदाब, मधुमेह रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांना तंबाखू सेवन व धुम्रपान याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेंतर्गत गर्भवती माता व इतर रुग्ण यांची मुखतपासणी करून तंबाखू सेवनाबाबतचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात दोन हजार ७८२ रुग्णांची तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. प्रभावी जाणीव जागृतीसाठी विविध ठिकाणी आरोग्य कॅम्प, व्यसन मुक्तीदूत, आयर्नमॅन नितीन घोरपडे यांनी उपस्थित धावपटू विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.