बुलडाण्यात बिबट्यांचा रात्री संचार चाले!एक नव्हे दोन बिबट्या रस्त्यांवर!आरएफओ चेतन राठोड म्हणतात...

माणसाच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी वन्यप्राण्यांची दिवसगणीक घटत जाणारी संख्या ही एक गंभीर समस्या आहे. स्वार्थी वृत्तीची माणसं वन्यप्राण्यांच्या जीवावर उठली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटाशी सामोरे जात आहे. वन्यप्राणी दिवसभरात जंगलाजवळच्या ज्या परिसराचा वापर करतात त्याला कॉरिडॉर किंवा मार्गिका असे म्हणतात.
माणसांनी संरक्षित आणि न संरक्षित केलेल्या जंगलाची सीमा त्यांना कसी कळणार ? प्राणी अनेक कारणासाठी असे कॉरिडॉर वापरत असतात. या मध्ये मांजर कुळातील प्राणी उदमांजर, रानमांजर मांसभक्षक अन्न, पाण्यांच्या शोधात रोज किमान २० ते २५ किलोमीटर प्रवास करत असतात. दरम्यान ते मानवी वस्ती, द्रुतगती मार्गावर सहजपणे येतात. भौगोलीक परिस्थिती प्रमाणे रस्त्याचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. नेहमी स्थलांतर करणारे प्राणी एकपेक्षा अधिक अधिवासाचा वापर करतात. वन्यजीवांना त्यांच्या हंगामी काळात जास्त प्रमाणात मार्गक्रम करावा लागतो. भरधाव वेगात सुटणाऱ्या वाहनांच्या अपघातात वन्यप्राणी आपला जीव कायमचा गमवून बसतात. दरवर्षी शेकडो प्राण्याचा मृत्यू होतो. गंभीर बाब आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा- खामगाव मार्गावर रात्रीच्या वेळी अनेक प्राणी रस्त्यावर येतात. काल २ बिबट्यांचे दर्शन झाले.त्यामुळे या प्राण्यांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून वन्यजीव विभागाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. वाहन चालकांनी अभयारण्यातून आपले वाहन सावकाश चालवावे असे आवाहन मान्य जीव विभागाचे आरएफओ चेतन राठोड यांनी केले आहे.