ट्रॅक्टर चालकाच्या सीटवर जाऊन बसला नागोबा! चालकासह मजूरांचा उडाला थरकाप!! 'शुभम' केले भयमुक्त

 
dgfgn
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  उन्हाळी सोयाबीनची मळणी ऐन रंगात असताना तब्बल ५ फुटाचा कोब्रा ट्रॅक्टर चालकाच्या सीटवर बसल्याचे आढळून आले! यामुळे चालकासह मजूर व शेतकऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. अखेर सर्पमित्राने त्या नागराजला पकडून सर्वांना भयमुक्त केले.

बुलडाणा तालुक्यातील अजीसपूर येथे काल, गुरुवारी दुपारी ही मजेदार व तितकीच खळबळजनक घटना घडली.  विठ्ठल किलबीले यांच्या शेतात उन्हाळी सोयाबीनची मळणी सुरू होती. ती अंतिम टप्प्यात असताना ट्रॅक्टर चालकाच्या जागेचा ताबा एका नागराजाने घेतल्याचे आढळून आले. यामुळे तिथे एकच खळबळ व धावपळ उडाली असतानाच किलबीले यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ याना आपबीती सांगितली. ते व्यस्त असल्याने त्यांनी सर्पमित्र शुभम शिल्लरकर याना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी शिताफीने कोब्राला बरनिबंद करून नंतर बोथा अभयारण्यात सोडून दिले.